मी एक न्हाणी घराण्याचा हौशी गायक आणि संगीतकार आहे. लहानपणापासूनच भारतीय अभिजात संगीताकडे माझा ओढा आहे. चांगली कविता वाचली की तिला चाल लावण्याचा नाद लहानपणापासूनचा आहे पण त्या चाली कधीच ध्वनिमुद्रित केल्या नव्हत्या. माझे एक संगीतकार मित्र श्री. विवेक काजरेकर ह्यांच्या प्रोत्साहनाने हल्ली मी लावलेल्या चाली ध्वनीमुद्रित करायला लागलो. आता ह्या चाली कशा वाटतात हे तुम्ही रसिकांनी ठरवायचंय! जे काही मनात येईल ते बिनधास्त कळवा.